मुस्लीम समाजात प्रगतिशील विचारांचे प्रवाह बलवान केल्याशिवाय आणि हिंदू व मुस्लीम समाज प्रत्येक प्रश्नावर कोणता विचार करत आहेत, याबाबत उपभपक्षी जागरूकता निर्माण झाल्याशिवाय आपल्या देशातील लोकशाही परिपक्व होऊ शकणार नाही

सर्वसामान्यपणे मुस्लीम समाजाबाबत हिंदू माणूस उदासीन असतो. मुस्लीम समाज हा निरनिराळ्या प्रश्नांचा कोणत्या पद्धतीने विचार करत आहे, याबाबत आस्थेवाईक जिज्ञासा लोकशाहीच्याही हिताची ठरेल आणि देशाच्याही हिताची ठरेल, हे बौद्धिकदृष्ट्या पटत असूनही हिंदू माणूस मुस्लीम समाजाच्या मानसिक आंदोलनांबाबत उदासीनच राहतो. हा उदासीन असणारा माणूस प्रश्नांचा कोणताही अभ्यास न करता मुस्लीमविरोधी असतो.......